अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीची हत्या hatya

सिरोंचा येथील घटना; आरोपी पतीला अटकसिरोंचा : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीचा घरातच गळा दाबून हत्या केली. ही घटना सिरोंचा शहरातील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये सोमवारच्या सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. घटनेसंदर्भात सिरोंचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्यारा पती गणेश मित्तापल्ली (30) याला सोमवारच्या रात्री अटक करण्यात आली. शेवंती गणेश मित्तापल्ली (28) असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे सिरोंचा शहरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास  गांभिर्याने सुरू केला आहे. 

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, गणेश मित्तापल्ली व पत्नी शवंती आपल्या एका मुलासोबत सिरोंचा शहराच्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये राहत होती. गणेश सिरोंचा शहरालगत असलेल्या तेलंगाना राज्याच्या हैदराबाद शहरात कामासंबंधात जात असायचा. यातच आरोपीची पत्नी शेवंतीचा दुस-या व्यक्तीसोबत प्रेम संबंध जुडला असल्याची भनक आरोपी पती गणेशला लागली होती. याच कारणावरून पति-पत्नी मध्ये नेहमी घरेलु भांडण व्हायचे. सोमवारच्या संध्याकाळी याच विषयावरून पती-पत्नी मध्ये  भांडण झाले. आरोपी पती गणेशला राग अनावर न झाल्याने रागाच्या भरात पत्नी शेवंतीचा आपल्या घरात गळा दाबून हत्या केली. सिरोंचा पोलिसांनी भांदवी कलम 302 अनुसार गुन्हा दाखल करून आरोपी पती गणेशला अटक केली. घटनेचा पुढील तपास एसडीपीओंच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या नेतृत्वात सिरोंचा पोलिस करीत आहे.


Post a Comment

0 Comments