गोंडवाना विद्यापीठाच्या वर्ग १ नवसंशोधन केंद्र ला मंजूर झालेल्या ५ कोटी पैकी २५ लाखांचा पहिला हप्ता प्राप्त Gondwana University
गडचिरोली : कौशल्य विकास व रोजगार निर्मिती मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे गोंडवाना विद्यापीठाला वर्ग १ चे नवसंशोधन केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी पाच वर्षांत तब्बल ५ कोटींचे अर्थसाह्य मिळणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचा २५ लाखांचा निधी नुकताच प्राप्त झाला असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी दिली आहे.

गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रात मुबलक प्रमाणात वनउपज व वनौषधी आढळतात, जे स्थानिक आदिवासी समुदायाच्या उपजिविकेचे मुख्य स्त्रोत आहे. हीच बाब लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठाचे वनउपज क्षेत्रातून अधिकाधिक स्टार्टअप कसे तयार होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्रामार्फत सुरू असलेले उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे युवकांमध्ये उद्योजकतेला चालना मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्ट अप धोरण २०१८ च्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाने घेतलेल्या स्टर्ट अप गतिरोध ला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे सादर करण्यात आलेल्या वर्ग १ इन्क्युबेटर सुरू करण्याच्या प्रस्तावास २९ ऑगस्ट २०२२ रोजी मान्यता प्रदान करण्यात आली होती.

या केंद्राचे संचालक प्रा. मनीष उत्तरवार यांनी गोंडवाना विद्यापीठाने नवउद्योजक निर्मिती पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी गत चार वर्षामध्ये विविधांगी
कार्यक्रम व उपक्रम घेतले. सद्यस्थितीत सदर नवसंशोधन केंद्र विद्यापीठाच्या नूतन प्रशस्त इमारतीत १००० चौ. फू. समर्पित जागेत कार्यान्वित असून नवद्योजक निर्मिती करिता एकूण ८ व्यवसाय अनुलंबाची ओळख करण्यात आलेली आहे. तसेच नवउद्योजक निर्मिती हेतू लागणारे कलम ८ प्रमंडळ नोंदणी करून निर्गमित करण्यात आले असून केंद्राने दैनंदिन कामकाज व मार्गदर्शन हेतू संचालक मंडळ तसेच कार्यकारी समितीचे गठण करण्यात आले आहे. याअनुषंगाने विद्यापीठाने वर्ग १ इन्क्युबेटरचा तपशिलवार प्रस्ताव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागास सादर केलेला होता.

सदर नवसंशोधन केंद्रास ५ वर्षे कालावधीकरिता ५ कोटी रुपयांची आर्थिक सहाय्यतेची तरतूद शासना कडून होती.त्यातील पहिल्या टप्प्याचा २५ लाखांचा निधी प्राप्त झालाय. किमान २५ नवउद्योजक निर्मितीचे लक्ष्य या केंद्रातर्फे आहे. सद्यस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्रातील उद्योजकांनी सहा हर्बल उत्पादने आणि पंधरा पंचगव्य आधारित उत्पादने तयार केली आहे. सदर इन्क्युबेटर स्थापित करण्याकरिता विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत श्रीधर बोकारे यांचे कुशल नेतृत्व व व्यापक अनुभव तसेच प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचे मार्गदर्शन आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांचे सहकार्य लाभले. तसेच नवसंशोधन केद्राचे संचालक प्रा. मनीष उत्तरवार यांच्या परिश्रमाचे हे फलित आहे.

कौशल्य विभागाच्या सचिव श्रीमती मनिषा वर्मा यांनी ही मागील महिन्यात विद्यापीठाला दिलेल्या भेटीत सदर वर्ग 1 नवसंशोधन केंद्र ट्रायसेफ चे उदघाटन दि 30 डिसेंबर रोजी केले व उपस्थित नव उद्योजक विद्यार्थी सोबत हितगुज केले. सदर केंद्र अंतर्गत गतिरोध प्रगतीने भारावून त्यांनी कौतुक केले व दरवर्षी एक कोटी म्हणजे पाच वर्षात पाच कोटी शासनाकडून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments