वनाधिका-यावर कारवाईसाठी '' ढोल बजाओ" आंदोलन करून वेधले प्रशासनाचे लक्ष


योगाची कुडवे यांच्यासह आंदोलकांनी दिला आत्मदहनाचा इशारा


गडचिरोली : आलापल्ली वनपरिक्षेत्रातील विविध कामांत तसेच बोगस मजूर दाखवून निधी खर्चात झालेल्या कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे योगाजी कुडवे यांनी ९ ऑगस्टपासून मुख्य वनविभाग कार्यालय (प्रादेशिक) समोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. मात्र आंदोलनाच्या १३ दिवसानंतरही वरिष्ठ स्तरावरून कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करीत आज कार्यलयासमोर 'ढोल बजाव' आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी उद्या २२ ऑगस्टला अर्धंनग्न, २३ ऑगस्टला मुंडण तर २५ ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा योगाची कुडवे व सहकाऱ्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे.


आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या झिमेला, तलवाडा, आलापल्ली या उपक्षेत्रात गुरे प्रतिबंधक चर खोदकाम तसेच अनेक कुप कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करीत आदिवासी मजुरांच्या खोट्या सह्या करून सदर रक्कम परस्पर हडप करण्यात आली असून. या कामाची सखोल चौकशी करून संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षकांना तत्काळ निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वात ९ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू आहे.

आज झालेल्या ढोल बजाव आंदोलनात योगाजी कुडवे यांच्यासह प्रणय खुणे, शंकर ढोलके, नीलकंठ संदोकर, आकाश मठ्ठामी, रवींद्र शेलोटे, आशिष नक्षीने, अरुण देशमुख, चंद्रशेखर सीडाम, लोमेश कोहळे, लोकेश डोंगरवार, त्रिंबक लोणबले, हिवराज कांबळे, सुरेश नागापुरे, लोमेश लाडवे, विश्वास लाडवे, रमेश लाडवे, स्वप्निल बोबाटे, श्रीधर राऊत, ईश्वर तिवारी, मोरेश्वर नागापुरे, अरविंद देशमुख आदींनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments