Gadchiroli लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागडतर्फे जागतिक हृदय दिवस निमित्त शिबिराची आयोजन
शिबीरात 150 पेक्षा जास्त रुग्णांंची झाली तपासणी

एटापल्ली : लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे मौजा हेडरी येथे जागतिक हृदय दिवसा निमित्ताने आरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी हृदयरोगीची लक्षणे व त्यापासून निदान कसे करायचे हे समजुन सांगितले. तसेच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आपल्या परिसरातील स्वच्छतेची निगा राखून आरोग्याची काळजी घेण्याचे सांगितले. शिबिरात दिडशे पेक्षा जास्त रुग्णांंची तपासणी करून आरोग्य उपचार करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन व दिप प्रज्वलन श्री. बापुराव दडस (एसडीपीओ हेडरी) यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्ष स्थानी लॉयड्स मेटल्स चे मेडीकल हेड डॉ. गोपाल रॉय, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ. चेतन बुर्रीवार, .सौ. सगुणा सडमेक (सरपंच ग्रा.पं.पुरसलगोंदी), .राकेश कवडो (उपसरपंच ग्रा.पं.पुरसलगोंदी), सौरव कवडो (पोलीस पाटील हेडरी), . कटीया तेलामी (माजी उपसरपंच),.संजय चांगलानी उपस्थित होते. सदर शिबिरात ग्रामपंचायत परिसराच्या गावातील रुग्ण व गावकरी तसेच लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाणचे अधिकारी उपस्थित होते.

जागतिक हृदय दिन हा दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि या आजारांचा जागतिक प्रभाव कमी करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी तो साजरा केला जातो. हृदयाच्या आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे हा जागतिक हृदय दिनाचा मुख्य उद्देश आहे.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVDs) च्या प्रतिबंधाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निमार्ण करण्याबाबत जागतिक हृदय दिन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तसेच तो तंबाखू सेवन, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीशी संबंधित धोक्यांकडे लक्ष वेधतो, जे हृदयरोग आणि स्ट्रोकमुळे अंदाजे ८० टक्के अकाली मृत्यूंना कारणीभूत ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) हृदय-निरोगी जीवनशैलीच्या संकल्पनेला मूलभूत मानवी हक्क म्हणून प्रोत्साहन देते आणि जगभरात तिचा अवलंब करण्याचे समर्थन करते.

Post a Comment

0 Comments