इंदिरानगर येथे भाजपा जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे यांच्या वतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

 कार्यक्रमात वाणाची केली देवाण-घेवाणगडचिरोली :  मकरसंक्रांत  निमित्ताने इंदिरा नगर येथील दुर्गा माता मंदिर चौक येथे आज 24 जानेवारीला  भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात उपस्थित महिलांना वाण  दिले.

    या कार्यक्रमा प्रसंगी दुर्गा माता चौक येथील महिला व छोट्या मुलींनी आपली नृत्य कला सादर केली.कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा आयोजन करण्यात आला होता.

    कार्यक्रमाला लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, अर्चनाताई चन्नावार,सुवर्णा कांचनन्नावार,माधुरिताई सजनपवार,नेवारेताई,स्नेहा एरोजवार,शीतल पगडपल्लीवार,ममता मधूपवार,वंदना कागदलवार,व दुर्गा माता चौक येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments