गडचिरोली : रविवारी २८ जुलैला गडचिरोली येथे पोलिस भरतीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली शहरात ठिकठिकाणी मोफत निवास आणि भोजनाची सोय केली आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात तनुश्री आत्राम आणि सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवेगाव कॉम्प्लेक्स येथील सृष्टी सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथील पटेल मंगल कार्यालय व इंदिरानगर येथील स्पप्नील मडावी अकॅडमी येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे. लेखी परिक्षेसाठी येणाऱ्या युवक, युवतींनी तनुश्री आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालय (8275877177),
स्वप्नील मडावी (9529933893),
उमेश उईके (8999956573),
कुणाल कोवे (9284658547),
सतीश कुसराम (7498462079)
तसेच जयश्री येरमे व रेखा तोडासे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तनुश्री आत्राम यांनी केले आहे.
0 Comments