सामूहिक विवाह मेळावे होणे आजच्या काळाची गरज : योगिता पिपरे

चामोर्शी येथे तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा 
      
चामोर्शी(गडचिरोली): ​श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चामोर्शी येथील संताजी भवन येथे रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा चे यशस्वी आयोजन करण्यात आले. 'दसरा आणि दिवाळीनिमित्त एक पाऊल समाजासाठी' या संकल्पनेतून आयोजित या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्या व विदर्भातून वधू आणि वर पक्षांनी व पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.
​सकाळी ११:३० वाजता सुरू झालेल्या या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील तरुणांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध झाले.
​या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले.
​मेळाव्याचे उद्घाटन माननीय सौ. योगिताताई प्रमोदजी पिपरे (माजी नगराध्यक्ष,नगरपरिषद गडचिरोली),तथा जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, गडचिरोली यांच्याशुभ हस्ते झाले,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री गजानराव भांडेकर अध्यक्ष मार्कंडा देवस्थान ट्रस्ट,प्रमुख उपस्थिती मा.बाबुराव कोहळे,नागपूर विभागीय उपाध्यस, प्रांतिक तेली महासंघ, सौ. योगीताताई भांडेकर (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली), आणि माननीय श्री. प्रमोद पिपरे (जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ व माजी सभापती न.प. गडचिरोली ) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
​यावेळी बोलताना सौ. योगिता पिपरे यांनी, योग्य जोडीदार निवडण्यात पालक आणि वधू -वरांना मदत करणे हे समाजाचे कर्तव्य असून, अशा मेळाव्यांमुळे हे कार्य अधिक सोपे होते, असे मत व्यक्त केले. तेली समाजाचे असे मेळावे होणे आजच्या काळाची गरज आहे आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितली.
​तर, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद पिपरे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी आणि संघटित राहण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले व संस्थेचे कौतुक केले.
​मेळाव्याचे आयोजन श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था आणि Wadhuwar Parichay (OPC) Pvt. Ltd., आरमोरी, जि. गडचिरोली यांनी केले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेल्या 95 च्या वर सर्व वधू-वर आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या व मेळावा यशस्वी करण्यासाठी आभार मानले.
​या मेळाव्यामुळे तेली समाजातील अनेक कुटुंबांना विवाह जुळवण्याच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे आणि हा उपक्रम समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल.
यावेळी, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये,मा. श्री. वेंकटेश सोमनकर, मा.श्री. तुळशीदासजी कुणघाडकर सर, मा. श्री. मधुकरजी भांडेकर, आणि मा. श्री. जितेशजी वैरागडे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments