कत्तलीसाठी जाणा-या 50 गोवंशांची सुटका

- राजमुद्रा फाऊंडेशन व टायगर ग्रूपचा पुढाकार


गडचिरोली:

एटापल्ली तालुक्यातील कसनसूर मार्गाने एकाट्रकमध्ये गोवंश तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, राजमुद्रा फाऊंडेशनच्या सदस्यांनी टायगर ग्रूप आलापल्लीच्या मदतीने सदर ट्रकला अडवून 50 गोवंशांची सुटका केली. सदर कारवाई शुक्रवारला करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली तालुक्यातील कसनसूर मार्गाने एका ट्रकमध्ये गोवंश तस्करी होत असल्याची माहिती राजमुद्रा फाऊंडेशनच्या सदस्यांना मिळाली. माहिती मिळताच राजमुद्रा फाउंडेशनच्या सदस्यांनी एटापल्ली येथे सदर ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकाने त्यांच्या अंगावर ट्रक चढवण्याचा प्रयत्न केला व ट्रक घेऊन पळ काढला. या घटनेबाबत आलापल्ली येथील टायगर ग्रुपला माहिती देण्यात आली. टायगर ग्रुपच्या सदस्यांनी आलापल्ली-एटापल्ली मार्गावर सापळा रचून रस्त्याच्या मधोमध दुचाकी उभ्या केल्या. सदर ट्रक येताच त्याला थांबवले. मात्र चालकाने ट्रक सोडून पोबारा केला. सदस्यांनी ट्रकची पाहणी केली असता, ट्रकमध्ये 50 गोवंश आढळून आले. घटनेबाबत अहेरी पोलिसांना कळविण्यात आले. सदर 50 गौवंशांची चंद्रपूर येथील राधे कृष्ण गौशाळेत पाठविण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचारी व टायगर ग्रूपचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments