केंद्र शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदींजींचे पोस्टकार्ड भरून घ्या- जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे lokpravah.com

गडचिरोली शहर भाजपा च्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 100 पोस्टकार्ड चे वाटप


गडचिरोली :भारतीय जनता पक्षाची केंद्रात 2014 मध्ये सत्ता आल्यानंतर देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गोरगरीब, कामगार, दारिद्र्य रेषेखालील नागरिक व महिलांसाठी नानाविध योजना अंमलात आणल्या.आज त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ करोडो भारतीयांना मिळत आहे. सदर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी असा मजकूर लिहलेले पोस्टकार्ड स्वीकारण्याचा उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असून येत्या पंधरवड्यात सर्व लाभार्थ्यांकडून पोस्टकार्ड स्वीकारवयाचे आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यां पर्यन्त पोहचून जास्तीतजास्त पोस्टकार्ड गोळा करावे व हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे. भाजपची गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठक आज दि 14 ऑक्टोबर रोजी गांधी चौकातील विश्रामगृहात पार पडली यावेळी ते बोलत होते

एकात्म मानवतावाद व अंतोदय प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची प्रेरणा घेऊन "अंत्योदय ते नव भारत उदय " संकल्पनेस प्राधान्य देत देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांनी देश सेवेसाठी अंतोदयाचा संकल्प करीत गोरगरीब शोषित व पीडित व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी व कल्याणाकरिता सतत सेवाव्रत आहेत. या त्यांच्या सेवेकरीता केंद्र सरकारच्या विविध लाभार्थ्यांशी संपर्क साधून माननीय पंतप्रधानांना "धन्यवाद मोदीजी" असा मजकूर लिहलेले पोस्टकार्ड पाठवून कृतज्ञता व्यक्त करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

गडचिरोली शहरातील गांधी चौकातील विश्रामगृहात पार पडलेल्या भाजपच्या गडचिरोली शहर बैठकीला  जिल्हा संगठण महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपचे गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेवक केशव निंबोड, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, अलकाताई पोहनकर, लताताई लाटकर, आदिवासी आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, भाजपचे गोवर्धन चव्हाण , युवा मोर्चाचे शहर महामंत्री हर्षल गेडाम, शहर सचिव प्रा.चंद्रशेखर गडसूलवार, तालुका उपाध्यक्ष बबन सूर्यवंशी, झोपडपट्टी आघाडीचे श्यामजी वाढई, युवा मोर्चा चे राजूभाऊ शेरकी, देवाजी लाटकर, महिला आघाडी च्या कोमलताई बारसागडे, पुनमताई हेमके, पिंकीताई कन्नाके व शहरातील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments