बौद्ध बांधवांना आम आदमी पार्टी तर्फे शरबत वितरण lokpravah.comकुरखेडा : आम आदमी पार्टी कुरखेडाचे वतीने ६६ व्या धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त आयोजित रैलीतील बौद्ध बांधवांना शरबत वितरित करून सामाजिक बांधिलकी जपली.
आज कुरखेडा येथील तपोभूमी येथून कुरखेडा शहर भ्रमण करत जय भिमचा जय घोष देत निघालेल्या बौद्ध बांधवांच्या रैलीतील उपासक उपसिकांकरिता येथील आम् आदमी पार्टीच्या कार्यालया समोर शरबत वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कुरखेडा येथील आम् आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुरखेडा तालुका संयोजक ईश्वर ठाकूर तथा तालुका सचिव ताहेर शेख यांनी  सहकार्य  केले. शरबत वितरना  करिता शहेझाद हाशमी, दीपक धारगाये , एजाज शेख, हिरा चौधरी, पंकज डोंगरे, सोनू रहांगडाले, साहिल साहारे,अंकुश मडावी,अतुल सिंद्राम, नाशिर हाश्मी, गणेश चौधरी आदी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments