समाजाला संतांच्या आध्यात्मिक विचारांची गरज : माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन lokpravah.com

रामनगर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचा समारोप


गडचिरोली : आज समाजामध्ये अनेक वाईट प्रवुत्ती दिसून येत आहेत आजची तरुण, युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेलेलीअसून व्यसनाधीन झालेली आहे. समाजाला चांगले विचार व आचाराची गरज असून अशा प्रकारे आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन आज वार्डा वार्डात , गावात व शहरांमध्ये होणे काळाची गरज असून आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातूनच सामाजिक एकतेचे दर्शन घडते व अशा आध्यात्मिक कार्यक्रमातून चांगल्या आचर विचारांची देवाण-घेवाण होते व भारत देशात होऊन गेलेले संत महात्मे क्रांतिकारी, थोर महापुरुष यांच्या विचाराची व त्यांच्या कार्याची समाजाला गरज असून आध्यात्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम गावोगावी घेणे काळाची गरज असून या माध्यमातूनच युवकांमध्ये चांगले विचार रुजवल्या जाऊ शकते व आध्यात्मिक कार्यक्रमातूनच सामाजिक एकता निर्माण होत असून संतांचे विचार समाजाला तारू शकतात असे प्रतिपादन गडचिरोली शहराचे माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाच्या समारोपिय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
*गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगरच्या वतीने रामनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताहाचा समारोप काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आला समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवराव होळी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे विश्वस्त तथा अध्यक्ष व आजीवन प्रचारक डॉ शिवनाथजी कुंभारे, भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हा संयोजिका तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे,  माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य  रमेशजी भुरसे, गुरुदेव सेवा मंडळाचे सुरेश मांडवगडे, माजी नगरसेवक सतीश विधाते, माजी नगरसेवक गुलाब मडावी, महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, व गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी आम. डॉ देवरावजी होळी, डॉ शिवनाथजी कुंभारे, प्रमोदजी पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर व त्याच्या समाजासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.*

     *14 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताहाचा समारोप काल दि. 20 नोव्हेंबर रोजी पार पडला या संपूर्ण सप्ताहात दररोज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पालखी, कीर्तन भजन व विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार व त्यांची ग्रामगीता रामनगर वार्डासह गडचिरोली शहरांतील नागरिक महिला व गुरुदेव भक्त व कार्यकर्त्यापर्यन्त पोहोचवण्याचे कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले या सप्ताहच्या यशस्वीतेसाठी रामनगर वार्डातील पुरुष महिला युवक युवतींनी मोलाचे योगदान दिले.

 समारोपीय कार्यक्रम पार पडल्यानंतर रामनगरासह भाविक व सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जवळपास 2000 लोकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला एकूणच रामनगर येथे पूर्ण सप्ताहात भक्तिमय वातावरण व तुकडोजी महाराजांच्या विचार व त्याच्या कार्याचा प्रसार, प्रचार करून सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*

Post a Comment

0 Comments