गडचिरोली : छत्तीसगड राज्य व भामरागड तालुक्यातील सीमावर्ती भाग असलेल्या फोदेवाडा गावानजीकच्या जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. यात नक्षल्यांचा विभागीय समिती सदस्य तथा कंपनी क्रमांक १० चा कमांडर प्रभाकर हा ठार झाला आहे. या चकमकीत दीपक मडावी हा जवान शहीद झाला असून, जोगा मडावी हा जवान जखमी झाला आहे.
३ फेब्रुवारीला संध्याकाळपासून सी
या चकमकीत गंभीर जखमी झालेला सी-६० पथकाचा जवान दीपक चिन्ना मडावी (३८) मूळ गाव मांड्रा(दामरंचा),ता.अहेरी यास आज पहाटे हेलिकॉप्टरने भामरागड येथे आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. जोगा मडावी, रा. किष्टय्यापल्ली हा जवान गोळी लागल्याने जखमी झाला. त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गडचिरोलीत शासकीय मानवंदना
शहीद जवान दीपक मडावी यांचे पार्थिव आज दुपारी हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पोलिस मुख्यालयाच्या पटागंणावर पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दीपक यांना मानवंदना दिली. याप्रसंगी नागपूरचे पोलिस आयुक्
लहानग्या मुलाने कडेवरुन मारला सॅल्यूट
शहीद जवान दीपक मडावी यांच्या पार्थिवाला मानवंदना देताना वातावरण शोकाकूल झाले होते. दीपक यांच्या १० वर्षीय मुलाने नातेवाईकाच्या कडेवर बसून आपल्या वडिलांच्या पार्थिवाला सॅल्यूट केला, तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. दीपक यांची वृद्ध आई श्रद्धांजली वाहताना बेशुद्ध पडली. डॉक्टरांनी तत्काळ त्यांच्यावर उपचार केले.




0 Comments