गळफास लावून यूवकाची आत्महत्या



गडचिरोली : आपल्या राहत्या घरी गळफास लावून युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार ता. ११ दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्डात घडली. मृतक युवकाचे नाव विनोद कुनघाडकर वय २८ असे आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत्यूचे कारण कळू शकले नाही. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments