गडचिरोली.
धनतेरस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली येथील मुल रोडवरील रोकडे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आकर्षक दागिन्यांचे विविध संग्रह, विशेष सवलती आणि सोने-चांदी जिंकण्याच्या संधी यामुळे रोकडे ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदा कंपनीच्या ‘ये है नया रोकडे’ या विशेष अभियानांतर्गत जाहीर करण्यात आलेली जीओएटी (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) ऑफर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
सण १९०२ पासून ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या रोकडे ज्वेलर्सने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना सादर केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ४० टक्के, १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ६० टक्के तर डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. जुन्या सोन्याच्या बदल्यात त्याच्या मूल्यावर १०१ टक्क्यांपर्यंत लाभ देण्याची विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. सोन्याच्या दागिन्यांवरील मेकिंग चार्जेस ५ टक्क्यांपासून सुरू होत असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ही ऑफर ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार असून नियम व अटी लागू आहेत.
शोरूममध्ये पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांसह दैनंदिन वापरासाठी हलके व आकर्षक दागिने, १८ व २२ कॅरेट सोन्याचे विविध प्रकार, डायमंड आणि फॅन्सी डायमंड ज्वेलरीचे नवनवीन डिझाइन उपलब्ध आहेत. प्रत्येक वयोगटातील ग्राहकांची आवड, गरज आणि बजेट लक्षात घेऊन दागिन्यांची विस्तृत श्रेणी सादर करण्यात आली आहे. खरेदीसोबत सोने व चांदी जिंकण्याच्या संधीमुळे ग्राहकांच्या उत्साहात आणखी भर पडत आहे.
धनतेरसच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी रोकडे ज्वेलर्सचे सर्व शोरूम सकाळी ८.३० वाजल्यापासून खुले ठेवण्यात आले होते. यावेळी रोकडे ज्वेलर्सचे संचालक पारस रोकडे यांनी ग्राहकांच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. ग्राहकांचे समाधान, पारदर्शक व्यवहार, दर्जेदार गुणवत्ता आणि आकर्षक डिझाइन यांना कंपनीचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह विदर्भातील विविध शहरांमध्ये रोकडे ज्वेलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा दिली जात आहे. धनतेरस व दीपावली निमित्त त्यांनी विदर्भातील सर्व ग्राहकांना शुभेच्छा दिल्या.


0 Comments