भाजप हा सर्वसामान्य लोकांना नेतृत्व देणारा पक्ष


, गडचिरोली : मागील ३० वर्षांपासून भारतीय जनता पार्टी त आपण पोस्टर लावण्यापासून तर शाखा अध्यक्ष,महामंत्री,व जिल्हाध्यक्ष असा प्रवास करीत इथपर्यंत आलोत, भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वसामान्य लोकांना नेतृत्व देणारा आहे, असे नवनियुक्त भारतीय जनता पार्टीचे  गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्राम गृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती सर्वाच्या मदतीने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल, भारतीय जनता पार्टी ही शेवटच्या घटकापर्यंत न्याय देऊन त्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योजनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहचून सेवा देत आहेत व त्यांना न्याय देण्याचा अविरत प्रयत्न करीत आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्याच पाउलावर पाऊल ठेवत सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा अविरत प्रयत्न करत आहेत.

शासनाने राबवलेल्या योजना ह्या सर्वसामान्य नागरिकांना कसे पोहोचविता येतील ते प्रशासनाच्या मदतीने व कार्यकर्त्याच्या मदतीने कसे करता येईल ते करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल भारतीय जनता पार्टी गडचिरोली चे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष म्हणून पक्षाने दिलेले कामे जबाबदारीने,व अथक परिश्रमाने पूर्ण करीन अशी माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी याप्रसंगी दिली.
आज पार  पडलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महामंत्रीआशिष पिपरे, प्रकाश गेडाम,चंगदेव फाये,अनिल तिडके, दिलीप चलाख यांचे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेला हजर होते.

Post a Comment

0 Comments