एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्‍या विद्यार्थांना मिळाले जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पधेत यश



अहेरी : महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचालित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील विद्यार्थी प्रकाश राजेश मडावी याने १९ वर्षीय (मुले ) भालाफेक स्पधेत द्वीतीय क्रमांक प्राप्त केला.  भाग्यश्री क्रुपाराम उसेंडी हिने १९ वर्षीय‌ (मुली) लांब उडी स्पधेत दृतिय क्रमांक व गोळाफेक स्पधेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. पवनेश्वरी सुरेश मडावी हीने १९ वर्षीय‌ (मुली) गोळाफेक स्पधेत दृतिय क्रमांक प्राप्त केला. ओम सुभाष नैताम याने  १७ वर्षीय (मुले) उंच उडी स्पधेत दृतिय क्रमांक प्राप्त केल.  अर्जुन  बक्का कुळमेथे याने १९ वर्षीय‌ (मुले) उंच उडी स्पधेत दृतिय क्रमांक प्राप्त केला.  .वैष्णवी तुळसिराम कोडापे  हिने १९ वर्षीय (मुली) लांब उडी स्पधेत दृतिय क्रमांक प्राप्त केला.  मोहन मडावी याने १९ वर्षीय (मुले) लांब उडी स्पधेत तृतीय क्रमांक प्राप्त केला तर  वनश्री चंद्रकांत सिडाम १९ वर्षीय (मुली) थाळीफेक स्पधेत तृतीय क्रमांक  प्राप्त केला. यश संपादन केलेल्‍या खेळाडूंचे प्राचार्य .वरुण उकर्डे,  क्रिडा शिक्षक धनराज सुधाकर पोटावी,  सहकारी शिक्षक सुशील हुलके,  मोईन खान पठाण आणि स‌र्व शिक्षक व शिक्षीका विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या.



Post a Comment

0 Comments