Gadchiroli ओबीसी समाजाला योग्य न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - खा.अशोक नेते

जागर यात्रेने केला ओबीसी समाजाच्या योजनांचा गजर




गडचिरोली : माझ्यासाठी आदिवासी समाजासह ओबीसी समाजही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. ज्याचा वाटा त्याला मिळायलाच पाहिजे, कोणावरही अन्याय होणार नाही ही माझी भूमिका आहे.  आणि त्यासाठी मी सरकारदरबारी नेहमीच प्रयत्न करत आलो आहे, असे म्हणत ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. हे सरकार ओबीसी समाजाला योग्य न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भाजपच्या अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी केले. ओबीसी जागर यात्रेचे रुपांतर मेळाव्यात झाले त्यावेळी उपस्थित नागरिकांना ते मार्गदर्शन करीत होते.

भाजप सरकारकडून ओबीसी समाजासाठी राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित या ओबीसी जागर यात्रेचे गडचिरोलीत उत्साहात स्वागत करण्यात आले. गडचिरोली ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी आशिष देशमुख आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या नेतृत्वातील या यात्रेच्या माध्यमातून बुधवारी सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारी पत्रके दुकानांमध्ये आणि काही घरांमध्ये जाऊन वाटण्यात आली. यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर यात्रेतील पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेऊन सरकारने घेतलेल्या ओबीसींच्या हिताच्या निर्णयांचा उहापोह करण्यात आला.


यावेळी रविंद्र चव्हाण, आ.कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, प्रदेश महिला मोर्चाच्या सचिव रेखा डोळस, ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सदस्य संगिता रेवतकर, गिता हिंगे, रविंद्र गोटेफोडे, अनिल तिडके, विलास भांडेकर, मु्क्तेश्वर काटवे, विवेक बैस, विनोद देवोजवार, केशव निंबोड, अनिल कुनघाडकर, कोमल बारसागडे, वैष्णवी नैताम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ही जागर यात्रा हनुमान मंदिर, तेली मोहल्ला, ढिवर मोहल्ला, बेसिक शाळा, वंजारी मोहला, रामपुरी वॉर्ड मार्गे गांधी चौक पोहोचल्यानंतर यात्रेचा समारोप झाला.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसच्या काळात आदिवासी गावे ओबीसीमध्ये आणि ओबीसी गावे आदिवासीमध्ये टाकून संभ्रम निर्माण कारण्यात आला. उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाची वाट लावली. काँग्रेस जनतेची दिशाभूल करीत आहे असा आरोप केला.  

यावेळी आशिष देशमुख यांनी गेल्या ९ वर्षात भाजप सरकारच्या नेतृत्वामुळे गडचिरोली जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सांगून या जिल्ह्यातील ओबीसींसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकर भरतीसाठी भाजपा प्रयत्नशिल  असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्यात बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय सर्वेक्षण व्हावे, या माझ्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे ओबीसींच्या विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार कृष्णा गजबे, संजय गाते, प्रशांत वाघरे यांनीही मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments