आदर्श पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा गोदावरी अर्बनने केला सन्मानवणी :-     भारतात प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे. शिक्षक हे आम्हांला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात,योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात अशा उज्ज्वल पिढी घडविणाऱ्या आदर्श शिक्षकांचा सन्मान गोदावरी अर्बनने आपल्या पाचही राज्यातील शाखा मध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आला.

     यावेळी वणी शाखेच्या वतीने श्री पांडुरंग महादेव मोहितकर सर, श्री सुधीर वटे सर, श्री किशोर उमाटे सर, श्री हेमचंद्र तिखट सर, श्री नितीन सोमलकर सर, श्री सुरेंद्र झाडे सर यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.

     गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे,  वरिष्ठ व्यवस्थापक रवि इंगळे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त  करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.समाजिक भान असणाऱ्या घटकांचा सन्मान व्हावा या हेतूने गोदावरी अर्बन विविध अभिनव उपक्रम राबवित असते,आदर्श शिक्षकांचा सन्मान व्हावा या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला असून समाजातील प्रत्येक शिक्षच सन्मानजनक आहेत पण प्रतिनिधीक स्वरूपात काही शिक्षकांचा सन्मान गोदावरी अर्बनच्या वतीने करण्यात आला अशी प्रतिक्रिया संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी दिली आहे.

     याप्रसंगी वणी शाखेचे शाखा व्यवस्थापक विजय मोडक, अनिरुद्ध पाथ्रडकर, असिस्टंट मॅनेजर सुनील चिंचोळकर, ज्युनिअर ऑफिसर प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, तुषार ठाकरे, मंगेश करंडे सब स्टाफ अतिष बुरेवार, जयवंत ओचावार, तथा समस्त दैनिक व आवर्त अभिकर्ता आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments