विकास मेळावा : ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने खा. अशोक नेते यांचे जल्लोषात स्वागत
भामरागड : तालुक्यातील भामरागड येथे नगर पंचायत विकासासाठी खासदार अशोक नेते यांनी विशेष प्रयत्न करून दोन कोटी चाळीस लक्ष रुपयांचा विकास निधी मंजूर केला. साेमवार १६ ऑक्टोंबरला विविध प्रभागातील मंजुर विकास कामांचे भूमिपूजन व विकास मेळावा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते हनुमान मंदिराच्या पटांगणावर भामरागड येथे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी खासदार अशोक नेते यांनी उद्घाटन प्रसंगी म्हणाले भामरागड तालुका हा अतिदुर्गम भाग म्हणुन ओळखला जातो, याकरिता या भागात नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण विशेष प्रयत्न करुन नगरपंचायतीतील विकास कामांना दोन कोटी चाळीस लक्ष रुपयांचा निधी माझ्या प्रयत्नाने मंजूर झाला. जनतेच्या विकास कामांसाठी विशेष प्रयत्न असून विकास कामे हाच माझा ध्येय आहे. यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांविषयी विस्तृत माहिती देत या विकास कामांचा निश्चितच नागरिकांना फायदा होईल. यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
याप्रसंगी भामरागड तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मोठया संख्येने नागरिक भाजपा पक्ष प्रवेश केला. राजेंद्र तानसेन, शंकर मादावार,श्यामराव कटकेल, नारायण दुंडलवार, सचिन चौधरी, समया कुकरवार, ओमकार पुजलवार, सुरेश कुरसय, गंगाराम आत्राम, योगेश मुरकेल, तुलसीराम दरमसोद, किशोर दुर्गे, शंकर मादावार, शोतया ऊमरवार, दशरथ आजमेरा, सम्या गावडे इत्यादींनी पक्षप्रवेश केला.
यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अशोक नेते, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे,नगराध्यक्षा रामबाई महाका( हलदार), भाजपा नेते तथा स्वीकृत नगरसेवक सुनिल बिशवास ,शहराध्यक्ष सम्राट मलिक,माजी नगरसेवक प्रा.चालुरकर,माजी जि.प.सदस्य जाकिर हुसेन,अल्पसंख्याक अध्यक्ष शकिल शेख,ता.उपाध्यक्ष जाधव हलदार,महिला आघाडी जि.उपाध्यक्ष भारती ईसटाम, महामंत्री अनंत बिशवास, नगरसेवक दलसु सळमेक, नगरसेवक दिलिप उईके, नगरसेविका लक्ष्मी आत्राम,बुथ अध्यक्ष प्रदिप मडावी,आशा वर्कर तसेच तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments