शाळा वाचवण्यासाठी राज्यभर आंदोलन करणार : राज्याध्यक्ष नवनाथ गेंडजिल्हा  मेळाव्यातून दिला आंदाेलनाचा इशारा

गडचिरोली  : समूह शाळेच्या नावाखाली शासनाने कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेकडो शाळा बंद होणार आहेत. हा निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी दिला आहे.

       कमल केशव सभागृह गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे आयोजित जिल्हा मेळाव्यात नवनाथ गेंड बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर, सुरेश डांगे नागपूर विभागीय अध्यक्ष, भाऊराव पत्रे विभागीय अध्यक्ष माध्यमिक, शरद काकडे विभागीय सचिव, संजय मेश्राम विभागीय उपाध्यक्ष, राजूभाऊ भिवगडे, जिल्हाध्यक्ष गडचिरोली पुंडलिक देशमुख, कु. आशा दाकोटे, जेडियु प्रदेश सचिव उमेश उईके, जेडियु जिल्हाध्यक्ष गोकुलदास झोडगे, मंगेश कामडी, जयदेव पाठराबे, राजेंद्र जिवतोडे, राजना बिट्टीवार, अमरदीप भुरले, गुरूदास सोमणकर, खुशाल भुरसे, संतोष मेंदाळे, हिराशिंग बोगा, अंतराम पदा, तुळशीदास ठलाल, हेमंत दुर्गे, श्रीकांत राऊत, पिंजूसकांती रॉय  उपस्थित होते.

     यावेळी नवनाथ गेंड म्हणाले समूह शाळांच्या उपक्रमातून कमी पटाच्या शाळा मोठ्या शाळेत वर्ग केल्या जातील परंतु विध्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक संख्या वाढली जाणार नाही. राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत परंतु शासन ते सोडविण्याऐवजी प्रश्न निर्माण करीत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला मुख्यालयाच्या नावाखाली शिक्षकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यालयाची मर्यादा 30 किमी करावी. वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा ग्राह्य धारावी. सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी. पदवीधर तथा विषय शिक्षक यांना सरसकट वेतनश्रेणी द्यावी. शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करावी. यासह  अन्य मागण्याचे ठराव मेळाव्यात घेण्यात आले. या जिल्हा मेळाव्यात सेवानिवृत्त होणारे शिक्षक भाऊजी वैरागडे यांचा व शिक्षक सहकारी पतसंस्थेत संचालक म्हणून नियुक्त रवींद्र गावंडे, हिराशिंग बोगा, भगवान मडावी, रमेश बघेल यांचा सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे संचालन रवींद्र गावंडे यांनी तर आभार अमरदीप भुरले यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हा कार्यकारणी व सर्व तालुका कार्यकारणी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments