मार्कंडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आमदार होळींची 'विकसित भारत' संकल्प यात्रा



गडचिराेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि योजनांच्या लाभार्थींना यात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी यांनी सोमवार पासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करणार असल्याची माहिती स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महामृत्युंजय मार्कंडेश्वराचे दर्शन घेऊन यात्रेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या १७ महत्वपूर्ण योजनांची माहिती,त्याच्या लाभापासून किती नागरिक वेगवेगळ्या कारणांनी वंचित राहिले आहेत त्याची कारणमीमांसा व तात्काळ सोडवणूकीचे प्रयत्न. यासाठी प्रशासनाशी थेट संवाद. राज्य सरकारच्या ११ महत्वाकांक्षी योजनांच्या संदर्भात नागरिकांशी संपर्क व चर्चा करणे. महिला सशक्तीकरण अभियान लोकांपर्यंत पोहोचवणे असे यात्रेचे स्वरूप आहे. या दरम्यान आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत आणि पंचायत समिती मध्ये आढावा घेण्यासाठी दोन तास अधिकाऱ्यांसमवेत बैठक करणार आहेत. यातून शासनाच्या योजनांच्या लाभार्थी आणि वंचित यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे आणि शेतकरी नेते रमेश भूरसे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments