बारावीतील युवतीची आत्महत्या



चामोर्शी : तालुक्यापासून जवळच असलेल्या सोनापुर येथील बारावीत शिकत असलेल्या श्रेया उंदिरवाडे या युवतीने वडिलांनी अभ्यास करण्याचे कारणावरून रागवल्याने राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना 7 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास चामोर्शो पोलिस स्टेशन अंतर्गत घडली. 

तालुक्यातील सोनापूर येथील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या अनिल उंदीरवाडे यांना दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. एक मुलगा नववीत शिकत असून श्रेया अनिल उंदिरवाडे ही चामोर्शी येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती. वडील अनिल यांनी श्रेयाला अभ्यास करण्याच्या कारणावरून रागावल्याने 7 जानेवारी रोजी रात्री 8.30 ते 9.30 वाजताच्या दरम्यान श्रेयाने घरीच ओढ़नीने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यामुळे कुटूंबियांना चांगलाच हादरा बसला. सदर माहिती पोलिस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनस्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Post a Comment

0 Comments