सोमनानी यांच्या सपत्नीक भेटीने भारावले रामभाऊ हस्तक महाराज



गडचिरोली : आरमारी तालुक्यातील वैरागड येथील सोमनानी परिवाराचे सेवा कार्यात मोठे योगदान आहे. त्यामुळेच या परिवाराची आरमोरी परिसरात मोठी ख्याती आहे. मानापुर येथील जेष्ठ नागरिक रामभाऊ हस्तक महाराज हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे बलराम सोमनानी यांना कळल्याने त्यांनी सपत्नीक हस्तक महाराज यांचे घरी जाऊन भेट दिली व तब्येतीची विचारपूस केली. बलराम सोमनानी यांच्या सपत्नीक भेटीने रामभाऊ हस्तक महाराज भारावून गेले. 

यावेळी माजी पंचायत समिती सभापती बघूजी ताडाम आदिवासी विविध सहकारी संस्था देलनवाडीचे व्यवस्थापक दिलीप कुमरे शीतल सोमनानी राहुल धाईत तुकाराम वैरकार वामन लाखनकर पंकज किरंगे भजनराव लाखनकर गजेंद्र डोंमळे रामदास डोंगरवार उपस्थित होते.

सोमनानी यांचे भेटीने सकारात्मक ऊर्जा :- रामभाऊ हस्तक महाराज

बलराम सोमनानी यांना माझ्या आजारपणाचे कळल्याने माझे घरी सपत्नीक भेट दिली व तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या भेटीने एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या शब्दाने आजारी असलेल्या व्यक्ती सुद्धा आपली व्याधी विसरून जातो. सोमनानी हे इतरांना सकारात्मक ऊर्जा देणारी व्यक्ती आहे. गौरोद्गार रामभाऊ हस्तक महाराज यांनी काढले.

Post a Comment

0 Comments