आ. डॉ. देवराव होळी हेच भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार : पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विजयी करण्याचा निर्धार

भाजप, शिवसेनेसह अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचीही बैठकीला उपस्थिती



 गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विकासासाठी झटणारे व सर्वसामान्यामध्ये मिसळणारे लोकांचे नेतृत्व आमदार डॉ देवराव होळी हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्याची क्षमता असलेले नेते आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे ते विजयी उमेदवार असल्याचा सूर भाजप, शिवसेनेसह अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये निघाला.

गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी  कोहळे,  माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, शिंदे गटाचे जिल्ह्याचे प्रमुख हेमंत भाऊ जंबेवार जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे , विधानसभा प्रमुख प्रमोदजी पिपरे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेशभाऊ भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जेष्ठ नेते डॉ तामदेवजी दुधबळे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, यांचे सह भाजपा, शिवसेना शिंदे गटाचे व अजित पवार गटाचे तालुक्याचे शहराचे अध्यक्ष ,प्रमुख , व महामंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.


बैठकीला उपस्थित सर्व महायुतीच्या नेत्यांनी मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामे आणली असून आजपर्यंत एकाही आमदाराला जे शक्य झाले नाही ते त्यांनी करून दाखवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आमदार डॉक्टर होळी यांच्या पाठीशी असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपा महायुतीचे विजयाचे उमेदवार असल्याने येणारा काळात त्यांना भाजपाने उमेदवारी द्यावी. त्यांना जिंकून आणण्यासाठी सर्व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या ताकतीने कामाला लागतील असा विश्वास या बैठकीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments