वडसा-गडचिराेली रेल्‍वे मार्गाकरिता गाैण खनिजाचे अवैध उत्‍खनन : माजी सरपंच शेडमाके यांची निवासी जिल्‍हाधिका-यांकडे तक्रार

 


जबाबदार अधिकारी, कर्मचा-यांना  निलंबित करण्याची माजी सरपंच नंदकिशाेर शेडमाके यांची मागणी 

गडचिराेली ः  वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे काम गतीने सूरू आहे. मात्र, हे काम करणारी कंपनी मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैध उत्‍खनन करून प्रशासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवित आहे. कंपनीकडून दंड वसूल करून अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्‍यांना तत्‍काळ निलंबित करावे, अशी मागणी खांबाळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच नंदकिशोर शेडमाके यांनी केली आहे.


शेडमाके यांनी निवासी उपजिल्‍हाधिकाऱ्यांकडे दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, महसूल विभागाच्‍या जागेतून जेपी इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीचे नियमबाह्यरित्‍या मुरूम उत्‍खनन केल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यांनी त्‍या संबंधातील फोटोसुद्धा जोडले आहे. रेल्‍वे मार्गाच्‍या कामासाठी पोर्ला महसूल मंडळातील महसूल विभागाच्‍या जागेतून 10 पोकलँड व 30 हायवाच्‍या माध्यमातून दररोज दिवस-रात्र हजारो ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्‍खनन केले जात असल्‍याचे शेडमाके यांनी म्‍हटले आहे. 


यापूर्वीही ठोठावला होता 235 कोटीचा दंड

मागील वर्षी जिल्‍हाधिकारी भाकरे यांनी चौकशी समिती गठित करून चौकशी केली असता संबंधित कंपनीने लाखो ब्रास मुरूमाचे अवैध उत्‍खनन केल्‍याचे निष्पन्‍न झाले. त्‍यानंतर जिल्‍हाधिकाऱ्यांनी 235 कोटी रूपयांचा दंड आकारला होता. या कारवाईमुळे संबंधित कंपनी शासनाचा करोडो रूपयाचा महसूल बुडवित असल्‍याचे निष्पन्‍न झाले होते. आतापर्यंत केलेल्‍या उत्‍खननाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून निलंबित करावे, अन्‍यथा 26 मे पासून आदिवासी संघटनेच्‍या माध्यमातून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच नंदकिशोर शेडमाके यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments