नागपूर, ता. ९ : पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या 'व्हॉईस ऑफ मीडिया' या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी व्यंकटेश दुडमवार यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संघटनेच्या मुख्यालयाकडून ७ जानेवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्राद्वारे जाहीर करण्यात आली.
संघटनेचे मुख्य संयोजक तथा राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ आणि मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात दुडमवार यांच्या पत्रकारितेतील उज्ज्वल कारकीर्दीचे कौतुक करण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे, "आम्ही आपली पत्रकारितेमधील उज्ज्वल कारकीर्द, काम पाहून आपली 'व्हॉईस ऑफ मीडिया' या पत्रकार संघटनेच्या विभागीय अध्यक्ष विदर्भ पदी नियुक्ती करत आहोत. ही नियुक्ती करत असताना आम्हांला मनस्वी आनंद होत आहे."
पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दुडमवार यांनी पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूल्याधारित पत्रकारितेच्या संरक्षणासाठी कार्य करावे. "ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाश्वत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठीच आपण काम करणार आहोत," असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, दुडमवार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड करून कार्यकारिणी जाहीर करावी आणि पुढील कामाला गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
'व्हॉईस ऑफ मीडिया' ही संघटना पत्रकारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, कार्यकारी अध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस दिव्या भोसले, कार्यकारी संचालक शांतनू डोईफोडे, कोषाध्यक्ष चेतन बंदेवार यांचा समावेश आहे. महाराष्ट्र टीममध्ये उपाध्यक्ष आणि समन्वयक अजितदादा कुंकूलोळ, मुख्य सचिव दिगंबर महाले, कार्यकारी अध्यक्ष विजय चोरडिया आदींचा समावेश आहे.
या नियुक्तीमुळे विदर्भातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुडमवार यांनी या जबाबदारीचे स्वागत करत पत्रकारितेच्या उन्नतीसाठी पूर्णपणे समर्पित राहण्याचे आश्वासन दिले आहे.
दुडमवार यांनी आपली कारकीर्द चंद्रपूर येथून प्रकाशित होणाऱ्या सन्नाटा या वृतपत्रामध्ये अहेरी शहर प्रतिनिधी म्हणून सुरूवात केली. ते मागील 23 वर्षापासून विविध वृत्तपत्रे, डीजीटल मिडिया व अनेक टीव्ही न्युज चॅनेल मध्ये काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. ते गडचिरोली चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात 'आज तक' या टीव्ही चॅनेल मध्ये प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी आपला जीव मुठीत घेत अतिदुर्गम भागांत जावून नक्षल घटनेच्या बातम्यांचे संकलन करून कव्हरेज दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व ग्रामीण भागांतील समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधून वाचा फोडली आहे. त्यांचे संघटन कौशल्य बघून व्यंकटेश दुडमवार यांची 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल इलेक्ट्रॉनिक विंग चे राज्य प्रवक्ता महेश तिवारी, राज्य कोर कमिटीचे मंगेश खाटीक, किशोर कारंजेकर, सुमित पाकलवार, संजय तिपाले,गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नासिर हाशमी, जिल्हा सरचिटणीस विलास ढोरे, जिल्हा कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील तिनसेहुन अधिक सदस्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



0 Comments