गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन प्रत्येक गल्लीपर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपद उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी व्यक्त केला आहे. रविवारी त्यांनी आपला सर्वसमावेशक विकास आराखडा जाहीर केला.
“शहरातील प्रत्येक नागरिकाचा विकास हा माझा प्रण आहे. गडचिरोलीला आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी मी कटीबद्ध आहे,” असे सांगताना प्रणोती निंबोरकर यांनी आपल्या प्रमुख प्राधान्यांचा पुनरुच्चार केला.
त्यांच्या विकास आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे :
मजबूत आणि सुगम रस्ते नेटवर्क
सांडपाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनाची आधुनिक यंत्रणा
स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी विशेष मोहीम
२४×७ शुद्ध पाणीपुरवठा
आधुनिक एलईडी स्ट्रीट लायटिंग
आरोग्य सुविधा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय
तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र व रोजगाराभिमुख प्रशिक्षण
महिलांसाठी सुरक्षित व सुलभ शहरी वातावरण
नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागावर भर देताना त्या म्हणाल्या, “हा विकास आराखडा केवळ कागदावरचा नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून मी शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यांच्याशी सतत संवाद ठेवून पारदर्शक व जवाबदार प्रशासन देणे हे माझे ध्येय आहे.
गडचिरोली शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि भविष्यातील गरजांना सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात सध्या विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चेला वेग आला असून, प्रणोती निंबोरकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मजबूत पाठबळ मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


0 Comments