अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

गडचिरोली-धानोरा मार्गावरील घटना


धानोरा : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी असल्याची घटना गडचिरोली-धानोरा मार्गावरील माडेतुकूम गावाजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मनोज येनगंटीवार रा.गडचिरोली असे मृतकाचे नाव असून रवींद्र सहारे हा जखमी आहे.
प्राप्त माहितीनुसार, मनोज व रवींद्र काही कामासाठी धानोराला गेले होते. सायंकाळच्या सुमारास एम.एच. 33 एच-4636 क्रमांकाच्या दुचाकीने धानोराकडून गडचिरोली शहराकडे परत येत होते. दरम्यान, गडचिरोली जिल्हा मुख्यालयानजीक धानोराकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जब्बर धडक दिली. या भीषण अपघातात मनोजचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या रवींद्रला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
--------------------------------------------

Post a Comment

0 Comments