ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड बनवून योजनेचा लाभ घ्या


 वैद्यकीय अधीक्षक डॉ. लिला मदने  यांचे आवाहन



ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे एप्रिल 2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जण आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधान मंत्री जण आरोग्य योजना सुरु झाली आहे. या योजने अंतर्गत आता पर्यत ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे 40 पेक्षा जास्त रुग्णांना  मोफत उपचाराचा लाभ देण्यात आला आहे.78 रुग्णांना योजेत नोंदणी करून पुढील उपचारासाठी पाठविले आहे.महात्मा ज्योतीराव फुले जण आरोग्य योजेत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लक्ष किंवा त्या पेक्षा कमी आहे अश्या कुटुंबाचा या योजनेत समावेश होतो. पात्र कुटुंबाला प्रतीवर्ष 1लक्ष 50 हजार पर्यत व मूत्रपिंड प्रत्यरोपणासाठी 2लाख 50हजार पर्यत लाभ घेता येतो.

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जण आरोग्य योजनेत सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणना 2011 च्या पात्र यादी नुसार योजनेत समावेश आहे. या योजने अंतर्गत पात्र कुटुंबाला प्रतीवर्ष रुपये 5लाख पर्यत वैद्यकीय सेवाचा लाभ घेता येतो. आयुष्मान भारत योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यां जवळ योजनेचे गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे.गोल्डन कार्ड बनविण्यासाठी नागरिकांनी येतांना रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन यावे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले गोल्डन कार्ड बनवून घ्यावे. गोल्डन कार्ड बनविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. लिला मदने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments