चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटकपदी उज्वला नलगे यांची पुनश्च नियुक्ती lokpravah.com

रणरागिणीच्या सत्याचा विजय


चंद्रपूर : चंद्रपूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी जिल्हा संघटक पदी उज्वला प्रमोद नलगे यांची पुनश्च नियुक्ती करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी नागाळा येथील कोल डेपोमुळे परिसतील शेतपिकांचे मोठे नुकसान होत असल्याबाबत काही शेतकऱ्यांनी सौ. नलगे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सौ. नलगे यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना कोल डेपोवर जाऊन माहिती घेण्यास सांगितले. तिथे जाऊन बघितले असता या डेपोमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान व मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे आढळून आले. याबाबत उज्वला नलगे यांनी घुग्गुस ठाणेदार यांना निवेदन दिले होते व अवैध कोल डेपो विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे धास्तावलेल्या कोल डेपो मालक श्री. अमित अनेजा यांनी नलगे यांच्या घरी जाऊन मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो पण आंदोलन करू नका, अशी ऑफर दिली. पण महिला, कामगार, शेतकरी यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सौ. नलगे यांनी आजवर कधी तडजोड केली नाही आणि कधी करणार नाही, म्हणून ही ऑफर धूडकावून लावली. श्री. अनेजा यांनी या संभाषणाची ध्वनिफीत बनवून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली व गुन्हे दाखल करण्यात आले. यादरम्यान सौ. नलगे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या रुग्णालयात भरती होत्या. यामुळे त्यांना याचा खुलासा करण्यास विलंब झाला. हीच संधी साधून काही विरोधकांनी त्यांच्या एकतर्फी तक्रारी वरिष्ठांकडे केल्या. त्याच आधारे पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी प्रकाशित झाली व ती सर्वत्र व्हायरल करण्यात आली. पण "रडायचं नाही लढायचं" या बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या रणरागिनी सौ. उज्वला नलगे यांनी थेट मुंबई गाठली. या खोट्या तक्रारीबाबत खुलासा व आपल्या आजवरच्या कार्याचा आढावा त्यांनी वरिष्ठांकडे सादर केला. वरिष्ठांनी याची पडताळणी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने सौ. उज्वला प्रमोद नलगे यांची जिल्हा संघटकपदी पुनश्च नियुक्ती केली. याबाबतचे वृत्त सामना दैनिकातून प्रकाशित करण्यात आले. सौ. नलगे यांच्या पुनश्चनियुक्तीने महिला आघाडीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. पुन्हा जोमाने पक्ष संघटन मजबूत करून नव्या क्रांतीची धगधगती "मशाल" जिल्ह्यात तळागाळात पोहोचविणार असल्याचा संकल्प सौ. नलगे यांनी केला आहे.
सौ. नलगे यांच्या पुनश्चनियुक्तीने कोल डेपो चालकांत धास्ती निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments