आष्टी पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून सुमारे १ लाख ३९ हजार ५०० रूपयांची दारू व ३ लाख रूपये किमतीचे वाहन जप्त केले आहे.
घाटकुळ ते बहादुरपूर-सुभाषग्राम मार्गे कारने दारूची वाहतुक केली जात असल्याची गाेपनिय माहिती आष्टी पाेलिसांना प्राप्त झाली. आष्टी पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक कुंदन गावडे, पाेलीस उपनिरिक्षक अजयकुमार राठाेड, पोलीस हवालदार चंद्रप्रकाश निमसरकर, पोलीस शिपाई रवींद्र मेदाळे, राजू पंचफुलीवार व विनोद गौरकार यांच्या पथकाने बहादुरपूर ते सुभाषग्रामदरम्यान सापळा रचला.
एम एच ३३ वी ३६८९ क्रमांकाची कार अडवून तपासणी केली असता, कारमध्ये १ लाख २८ हजार रूपये किमतीची देशी दारू, ११ हजार ५०० रूपये किमतीची विदेशी दारू आढळली. ही दारू जप्त करण्यात आली. तसेच ३ लाख रूपये किमतीची कारसुद्धा ताब्यात घेतली. दाेन आराेपींना अटक करण्यात आली.
0 Comments