संस्थेतून समाजात लोकाभिमुख कार्य करणारे विद्यार्थी घडतील
कमकिशोर फुटाणे यांचा विश्वास : स्थानिक स्वराज्य संस्थेचा वार्षिकोत्सव
पुढे बोलताना श्री. फुटाणे म्हणाले, प्रशासनात काम करताना झोकून कार्य करणारे आणि लोकाभिमुख कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी असणे आवश्यक असते. स्थानिक स्वराज्य संस्थेतून काम करताना प्रशिक्षण आवश्यक असते. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी होते. त्यामुळे ते प्रभावीपणे काम करू शकतात. शासनाच्या अनेक योजना असतात, त्या जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचिविण्याचे काम प्रशासनाचे असते. यासाठी संस्थेतील विद्यार्थ्याना याचा फायदा प्रशासनात काम करताना निश्चितपणे येईल, असेही कमलकिशोर फुटाणे म्हणाले.
यावेळी विविध अभ्यासक्रमातून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता निरिक्षक अभ्यासक्रमात प्रथम पारितोषिक मंजिरी राऊत हिला मिळाले. द्वितीय पारितोषिक मौसम बैरिशाल, मितेशा चावरे, हर्षना लाडे, शैलजा पवार यांना मिळाले. तिसरे पारितोषिक वैभवी भुजाडे हिला मिळाले. अग्निशमनकर्मी अभ्यासक्रमातून प्रथम आलेल्या योगेश नेमाडेला देखील पारितोषिक प्रदान करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात रूजू झालेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये याशिका राऊत, संदीप चाटे, रोशन बैसकर, वैभव राऊत, काशिनाथ मुजमुले, दिनेश देवकाटे, महेश ठाकरे, बालाजी केंद्रे, अनिकेत मेरकेटे, कार्तिक शहाणे, हर्षल वैद्य यांचा समावेश आहे.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक विभागीय संचालक जयंत पाठक यांनी केले. भाग्यश्री वाडे यांनी संचालन व आभारप्रदर्शन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य कौतुकास्पद – गजानन निमदेव
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत विविध अभ्यासक्रम व तसेच विविध उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता बांधणीसाठी राबविले जातात, हे खरोखर कौस्तुकास्पद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महत्वाचा घटक म्हटल्या जाणारा स्वच्छता निरिक्षक इथे घडवला जातो. समजात आपत्ती निवारण करण्यासाठी अग्निशमनकर्मी तयार केले जातात. त्यांना प्रशिक्षित केले जाते, हे खरोखर उल्लेखनीय आहे. यापुढेही असेच चारित्र्यवान, सद्गुणी आणि सामर्थ्यवान विद्यार्थी समाजासाठी पुढे येतील, असा विश्वास मुख्य संपादक गजानन निमदेव यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य दिनाचे औचित्यसाधून संस्थेतर्फे सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रक्तदान शिबराच्या उद्घाटनला प्रसिद्ध गिर्यारोहक विमला नेगी देऊस्कर, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विमला नेगी यांनी आपले अनुभव उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मिर्झा बेग यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण
मुख्य कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला स्वच्छता निरिक्षक जानेवारी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी जयोस्तुते व पोवाडा सादर केला. विद्यार्थीनींनी विविध गाण्यायंवर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी ऍसिड अटॅक या विषयावर उत्कृष्ट नाटक सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी राही बापट, मंजिरी जावडेकर, सुशील यादव, जयंत राजुरकर, दीपक वनारे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments