नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कारlokpravah.com,
गडचिरोली : जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रम उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली.  जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता ते प्रमाण कमी करण्यांसाठी 15 वा वित्त आयोगातून बालकांना विशेष आहार उपक्रम राबविला. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण 50% चे वर कमी झाले.
या भरीव आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव आज 30 सप्टेबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात पुष्पगुछ तथा गौरवशाल सन्मानचिन्ह देऊन समाजभान जपणारा आदरपूर्वक सत्कार गट विकास अधिकारी धनंजय साळवे  यांचे हस्ते करण्यात आला.या प्रसंगी पंचायत समिती, गडचिरोली चे गट शिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती पतकमवार, विस्तार अधिकारी शिक्षण एन. एस. कुमरे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी एफ एस लांजेवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments