शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा lokpravah.com
चंद्रपूर ः शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा शिवसेना महिला आघाडी, चंद्रपूर जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे यांच्या पुढाकाराने तुळजाभवानी मंदिर, चिंचाळा येथे नुुकताच पार पडला.

सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडखे, प्रा. निलेश बेलखेडे, जिल्हा संघटीका नर्मदा बोरीकर, सौ. नलगे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी प्रा. शिल्पाताई बोडखे, नर्मदा बोरीकर, सिनेट सदस्य म्हणून निवडून आलेले प्रा. निलेश बेलखेडे, युवती सेना उपजिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, ग्रा. पं. सदस्या निर्मला कांबळे यांच्यासह नवनियुक्त चंद्रपूर शहर संघटक वर्षा कोठेकर, उपजिल्हा संघटक विद्या ठाकरे, चंद्रपूर विधानसभा संघटक बबली पारोही, विधानसभा समन्वयक निशा धोंडगे, किरण जुनघरे, तालुका संघटक लता शेंडे, घुग्घुस शहर संघटक संध्या जगताप, जिल्हा समन्वयक कल्पना गोरघाटे (राजुरा व बल्लारपूर विधानसभा), बल्लारपूर शहर संघटक ज्योती गहलोत, उपजिल्हा संघटक सुवर्णा मुरकुटे (बल्लारपूर विधानसभा), तालुका संघटक मीनाक्षी गलगट, बल्लारपूर शहर समन्वयक अर्चना महाजन, बल्लारपूर तालुका समन्वयक रंजिता बिरे, पोंभुर्णा तालुका संघटक कांता मेश्राम, रजनी झाडे (मुल), ज्योती नळे (राजुरा), सिंधू जाधव (जिवती) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मंजुषा वैद्य यांनी केले. या सत्कार सोहळ्यासाठी शामली रासेकर, सुप्रित रासेकर, भास्कर ठावरी, आकाश पावडे, निखिल घाडगे, अक्षय नामपल्लीवार, योगेश पुनवटकर, रोशनाताई, वंदनाताई, संगिताताई, नंदाताई, मंदाताई, सारिकाताई, स्वातीताई, शिल्पाताई, पायलताई, नरयेड्डीवारताई, काळेताई, गोहणेताई, ढोयेताई, नागरकरताई, अचेनाताई, छबितताई, राणेताई, फुलरवारताई, बहुरियाताई आदींनी परिश्रम घेतले. यावेळी युवती सेना तालुकाप्रमुख प्रगती पडगेलवार, तालुका चिटणीस प्रियंका जगताप, शहर चिटणीस धनश्री हेडाऊ, शाखा अधिकारी शारदा निर्गुडवार, शिवसेना, महिला आघाडी, युवती सेना, युवासेना कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवात बये दार उघड या मोहिमेंतर्गत प्रा.शिल्पाताई बोडखे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments