समाज मंदिर बांधकामाचे माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन lokpravah.comएटापली : तालुक्यातील कोंदावाही येथे समाज मंदिर बांधकाम कामाचे भूमिपूजन माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते करण्यात आले. 

कोंदावाही येथे काटवली देवी असून परिसरातील समाजबांधव या ठिकाणी पूजापाठ करीत असतात. मात्र, याठिकाणी समाज मंदिर नसल्याने नागरिकांपुढे निवासाची अडचण निर्माण होत होती. अजय कंकडालवार जिपचे अध्यक्ष असताना या गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार कंकडालवार यांनी समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला. नुकतेच या कामाचे भूमिपूजन माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते करण्यात आले. 

यावेळी पोलिस पाटील अजय गावडे, ग्रापं सदस्य सुनीता गावडे,  सरपंच गणेश गोटा, अनिल कर्मरकर, सी.पी.वेलादी, महेश बीरमवार, दादा बिडरी, प्रकाश वेलादी, संतोष बीरमवार, कोलू पैमा, बंडू तलांडे, राकेश देवताडे, राहुल बीरमवार, बापू गावडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments