नगर परिषद कार्यालयाने गोटूलवर केलेले अतिक्रमण तत्काळ हटवा lokpravah.com

अन्यथा तिव्र आंदोलन - वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


गडचिरोली, : स्थानिक गडचिरोली नगर परिषद कार्यालयाने गेल्या विस वर्षापासून गोटूलवर केलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारी मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी शासनाकडून सन २००० मध्ये गोटूल या सांस्कृतीक भवनाची निर्मीती करण्यात आली, आदिवासी संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी गोटूलचे हस्तांतरण आदिवासी समाज बांधवांकडे किंवा निमशासकिय समितीकडे करायला पाहिजे होते परंतु असे न करता नगर परिषदेने अतिक्रमण करून स्वत:चे कार्यालय थाटून कब्जा केल्याने नगर परिषदेने आदिवासी समाज बांधवांच्या भावनाशी खेळ करणे थांबवून भावनांचा उद्रेक होण्याआधी नगर परिषदेने केलेले अतिक्रमण कार्यालय स्वत:च्या ईमारतीत हलवावे व गोटूल भवन आदिवासी समाज बांधवांकडे सुपूर्द करण्यात यावे असेही या निवेदनात म्हटले आहे.
ज्या उद्देशासाठी गोटूल या ईमारतीची निर्मीती करण्यात आली ते पूर्ण करण्यााठी नगर परिषदेने केलेले अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे अन्यथा वंचितच्या वतिने तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
     निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, जेष्ठ कार्यकर्ते बाशिद शेख, शहराध्यक्ष  दिलीप बांबोळे, उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, सोनलदिप देवतळे, निखील वाकडे, भोजराज रामटेके, मनोहर कुळमेथे, जावेद शेख, आशिष केळझरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments