गडचिरोली : जिल्हा पोलिस दलाच्या जवानांनी शुक्रवारी नक्षलविरोधी अभियान राबवून धानोरा तालुक्यातील सावरगाव परिसरातून 10 लाखांचे बक्षिस असलेल्या दोन नक्षल्यांना अटक केली होती. तसेच शनिवारी दोन्ही नक्षल्यांना न्यायालयापुढे हजर केले असता, त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. यामुळे सोमवारी पुन्हा दोन्ही नक्षल्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
पीपीसीएम सनिराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा शामलाल नरोटे (24) व सुमराम उर्फ सुर्या घसेन नरोटे (22) हे अटकेत असलेले दोन्ही नक्षली अबुझमाड येथून उत्तर गडचिरोलीमध्ये नक्षल चळवळ मजबूत करण्याच्या निरीक्षणासाठी आले होते. याची गुप्त माहिती मिळताच जिल्हा पोलिस दलाच्या जवानांनी नक्षल विरोधी अभियान राबवून दोन्ही नक्षल्यांना शुक्रवारी अटक केली होती. सदर नक्षल्यांना न्यायालयापुढे उभे केले असता सोमवारपर्यंत पोलिस रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच सोमवारी पुन्हा दोन्ही नक्षल्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रकरणाचा अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
0 Comments