आनंदाचा शिधा अर्धवट,दोन महिण्याचा नियमीत पूरवठाही ठप्प,शिवसेना पदाधिकार्यांची स्वस्त धान्य दूकानाला भेट lokpravah.comकूरखेडा : राज्य शाशनाने मोठा गाजावाजा करीत दिवाळीची भेट म्हणून शाशकीय स्वस्त धान्य दूकाना मार्फत आनंदाचा शिधा म्हणून प्रति शिधापत्रीका १०० रूपयात दरात रवा,दाळ,खाद्यतेल व साखर या चार वस्तू उपलब्ध करून देण्याची घोषणा केली मात्र प्रत्येक्षात १०० रूपये घेऊनही कूठे दोन तर कूठे तिन वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहे तर मागील दोन महिण्याचा नियमीत अन्न धान्याचा पूरवठा सूद्धा करण्यात आला नसल्याने जनतेचा दिवाळीचा आनंदावर विरजन पडला आहे असा आरोप येथील शिवसेना पदाधिकार्यानी केला आहे
शहरातील राणाप्रताप वार्डाचा अन्न धान्याचा पूरवठा असलेला शाशकीय स्वस्त धान्य दूकानाला आज मंगळवार रोजी शिवसेना पदाधिकार्यांनी भेट दिली यावेळी येथे आनंदाचा शिधा योजने अंतर्गत खाद्यतेल व रवा या दोनच वस्तू लाभार्थाना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे दिसून आले याबाबद दूकानाचे संचालक याना विचारणा केली असता दोनच वस्तूचा पूरवठा शाशनाकडून करण्यात आल्याने ते वितरीत करण्यात येत आहे असे सांगीतले दिवाळीचा आनंद द्विगूणीत करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनेचा पूरवठ्यात सूसूतत्रा नसल्याने लाभार्थाना दिवाळी साखर व दाळी शिवायच साजरी करावी लागली तसेच मागील सप्टेबंर व आक्टोबंर या दोन महिण्याचा नियमीत मीळणारा लाभार्थांचा गहू, तांदूळ व साखर याचा पूरवठा तालूक्यात करण्यात आलेला नाही त्यामूळे लाभार्थांची अडचण झालेली आहे असा आरोप शिवसेना तालुका प्रमूख तथा न प गटनेता आशिष काळे नगरसेवक जयेन्द्र सिंह चंदेल नगरसेवक अशोक कंगाले,खूशाल बंसोड यानी केला आहे
कोट
याबाबद येथील तहसील कार्यालयाचे पूरवठा निरीक्षण अधिकारी अशोक कूथे याना विचारणा केली असता शहरातील तिन दूकानात तेल रवा व साखर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर राणाप्रताप वार्डातील दूकानात गोदामात मालाचा शार्टेज असल्याने फक्त तेल व रवा उपलब्ध करून देण्यात आला आहे मालाची उपलब्धता होताच सर्व दूकानात योजनेचा उर्वरीत मालाचा पूरवठा करण्यात येईल तसेच थकीत असलेला दोन महिण्याचा नियमीत अन्नधान्याचा पूरवठा सूध्दा करण्यात येईल .

Post a Comment

0 Comments