शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरीlokpravah.com



गडचिरोली : स्थानिक शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे रविवार 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. आर. के. नंदागवळी होते.

कार्यक्रमा अंतर्गत सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती याच्या प्रतिमेला माल्यार्पण व व्दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर इतिहास विभाग प्रमुक डॉ. के आर. भांडारकर  यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शेवटी अध्यक्षीय भाषणाद्वारे महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. आर. के. नंदागवळी यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आपला सर्वागीण विकास साधण्यासाठी अश्या थोर महापुरूषांचे जीवन चरित्र वाचायला पाहिजे,  असे उपस्थित सर्वांना आव्हाहन केले. या कार्यक्रमानंतर लगेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे डॉ. आर. एस. गोरे व प्रा. एस. सी. राउत कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्गदर्शखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकाद्वारे महाविद्यालयात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.

कार्याक्रमचे संचालन सांकृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. जी. उईके तर आभार प्रा. आर. एस. कोल्हे यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी-विध्यार्थिनी, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकवृंद, कनिष्ट महाविद्यालयीन प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments