भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने धन्यवाद मोदीजी अभियानाला सुरवात lokpravah.com
कुरखेडा : भारतीय जनता युवा मोर्चा तालुका कुरखेडाच्या वतीने धन्यवाद मोदी जी अभियानाला सुरवात करण्यात आली असून या अभियानाच्या माध्यमातून युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तालुक्यातील प्रत्येक गावात जावून केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी यांची भेट घेऊन त्यांना पोस्ट कार्ड देऊन लाभार्थ्यांना स्वयं स्फूर्तीने त्या कार्डावर केंद्र सरकारच्या मिळालेल्या योजना संदर्भात धन्यवाद मोदीजी असं लिहून हे कार्ड हजारोंच्या संख्येत कुरखेडा तालुक्यातून पाठवणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
धन्यवाद मोदी ,नव मतदार नोंदणी अभियान ,व मन की बात हे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्या करीता जिल्हा संघटन मंत्री रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोंविदजी सारडा, भाजयूमो जिल्हाअध्यक्ष चांगदेव फाये
यांच्या प्रमूख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीला भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, भाजपा तालुका महामंत्री तथा पाणीपुरवठा सभापती एडवोकेट उमेश वालदे, नगरसेवक रामभाऊ वैद्य, नगरसेवक सागर निरंकारी, नगरसेवक अतुल झोडे, भाजपा महिला तालुका अध्यक्ष जयश्री मडावी, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, भाजयुमो महामंत्री उल्लास देशमुख, तुषार कुथे, प्रशांत हटवार, पुष्प राज रहांगडाले उपस्तीत होते. यावेळी केंद्र सरकारचा योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी यांच्या घरी भेट घेऊन त्याच्याकडून देशाचे एसएससी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद मोदीजी हे कार्ड च्या माध्यमातून लिहून देण्याकरिता अनेक नागरिकांनी स्वयंपुरतीने कार्डवर धन्यवाद मोदी लिहून दिले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments