कुंभीटोला येथे कृषी यांत्रिकीकरनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन lokpravah.com




कुरखेडा : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या अनेक वर्षापासून विविध कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांना कधी शेताच्या बांधावर जाऊन, प्रत्येक वाड्यात, खेड्या पाड्यात जाऊन सभाघेऊन कृषी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता याव्हा म्हणून मार्गदर्शनाचे कार्य सुरु आहे. त्याच प्रमाणे येथील कृषी सहाय्यक दामिनी मेश्राम यांनी तालुक्यातील कुंभीटोला येथील शेतकऱ्यांना सभेचे आयोजन करून कृषी यांत्रिकीकरनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी यांत्रिकीकरना मध्ये टॅक्टर, पॉवर टिलर, टॅक्टर व पॉवर टिलर चलित औजारे आतंरमशागत औजारे, कल्टीव्हेटर, नांगर, पेरणीयंत्र, लागवडयंत्र, रोटाव्हेटर, कापणीयं पीक सरंक्षण औजारे, मळणीयंत्र, मल्चींगयंत्र, टॅक्ट्रर ट्रॉली व कृषी औजार बैंक स्थापन आदी व सिंचन सुविधाकरीता ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रीकल मोटार, इंजिन, पाईप्स, वैयक्तीक शेततळे व शेततळे अस्तरीकरण तसेच फलोत्पादन करिता कांदाचाळ, पॅक हाऊस, शितगृह, प्रिकुलींग युनिट, हरितगृह, शेडनेट,पॉलीहाऊस, प्लास्टिक मल्चींग, बाग लागवड (फळे, फुले, मसाला व सुंगधी पिके) मधुमक्षिकापालन, सेंद्रीय शेती, बाजार सुविधा स्थापन करणे व प्रक्रिया प्रकल्प विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विभुतरव भांडारकर, विनायक इसकापे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments