महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गजेंद्र डोमळे, गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी मोहन ठाकरे तर गडचिरोली जिल्हा महिला अध्यक्षपदी ग्रीश्मा मून यांची निवड
गडचिरोली : जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून शनिवार 10 डिसेंबर रोजी भारतीय मानवाधिकार परिषदेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. गठित करण्यात आलेल्या कार्यकारिणीत भारतीय मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गजेंद्र जनार्दन डोमळे यांची तर गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी मोहन कुसण ठाकरे, गडचिरोली जिल्हा महिला अध्यक्षपदी ग्रीश्मा विवेक मून यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भारतीय मानवाधिकार परिषदेचे संचालक अविनाश मोकाशी यांनी केली.
नवनियुक्त मानवाधिकार संरक्षक मानवाधिकाराची योग्य संकल्पना समाजासमोर मांडून भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून लोकोपयोगी कार्य करणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गजेंद्र डोमळे, गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी मोहन ठाकरे तर गडचिरोली जिल्हा महिला अध्यक्षपदी ग्रीश्मा मून यांची निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांने अभिनंदन होत आहे.
0 Comments