मुल ते चामोर्शी रेल्वे मार्ग निर्माण करण्याचे पत्र जिलाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त यांना पाठविले,प्रा.संतोष सुरपाम यांची माहीती
मार्कडादेव/ गडचिरोली: - विदर्भाची काशी म्हणुन ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कडादेव च्या विकासाकरीता व लाखो येणाऱ्या शिवभक्ताच्या सोयीसुविधा करीता मुल ते चामोर्शी रेल्वे मार्ग निर्माण व्हावे या आशयाचे निवेदन जिलाधिकारी संजयकुमार मिणा यांना प्रा.संतोष छबिलदास सुरपाम अध्यक्ष मार्कडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षीत बेरोजगार विकास संस्था मार्कडादेव यांनी दिले होते सदर निवेदनावर योग्य कार्यवाही करत,जिलाधिकारी कार्यालयातील निवासी जिलाधिकारी समाधान शेंडगे यांनी सदर निवेदन नागपुर विभागीय आयुक्त यांना पुढील कार्यासाठी पाठविले असल्याचे पत्र प्रा.संतोष छबिलदास सुरपाम अध्यक्ष मार्कडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षीत बेरोजगार विकास संस्था मार्कडादेव यांना पोस्ट द्वारा माहीती दिली असुन मार्कडादेव क्षेत्राच्या विकासासाठी रेल्वेची भुमिका अति महत्वाची असुन जर हे रेल्वे मार्ग पुर्ण त्वास आले तर संपुर्ण तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवती सह कुशल अकुशल युवक युवतींना रोजगाराची संधी ऊपलब्ध होईल असा आशावाद प्रा.संतोष छबिलदास सुरपाम यांनी व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments