काँग्रेसच्या पैदल मोर्चात तालुक्याचे पदाधिकारी सहभागीकूरखेडा : काँग्रेस पक्षाकडून गडचिरोली ते नागपूर काढण्यात आलेल्या पैदल मोर्चात कूरखेडा तालूक्यातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हा लक्षवेधी मोर्चा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर विविध मागण्यांना घेऊन धडकणार आहे. 

          नागपूर विधानभवनावर हा मोर्चा २१ डिसेंबर रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात मेडिगट्टा धरणामुळे जिल्ह्यातील शेतक-यांवर झालेला अन्याय दूर करणे, अतिवृष्टीने झालेली नुकसान  भरपाई, कोनसरी लोह प्रकल्पात स्थानीकाना रोजगार, नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता हा लक्षवेधी मोर्चा धडकणार आहे. 

सद्या हा पैदल मोर्चा उमरेड ते नागपूर दरम्यान मार्गक्रमण करीत आहे. या मोर्चात कूरखेडा काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जिवन नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी जि. प. सदस्य प्रभाकर तूलावी, माजी जि प सदस्य नंदू नरोटे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम, तूकाराम मारगाये, अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जावेद शेख, महिला काँग्रेस अध्यक्ष आशाताई तुलावी, कपील पेंदाम हे तालूक्याचे प्रतिनिधित्व करीत सहभागी झाले आहेत.  २१ डिसेंबर रोजी तालूक्यातून मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जिवन नाट यानी दिली. 

Post a Comment

0 Comments