महाविद्यालयीन अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश करणे गरजेचे- योगिता पिपरे lokpravah.com

गोंडवाना विद्यापीठात संविधानावर एकदिवसीय कार्यशाळा



गडचिरोली : संविधान मुळे नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार प्राप्त झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व शोषित पीडित गरीब नागरिकांसाठी त्यांचे अधिकार हक्क मिळावे म्हणून सर्व घटकांचा, तांत्रिक व उपयुक्त बाबींचा समावेश भारतीय संविधानामध्ये केलेला आहे. त्यामुळे आज सर्वांना समान हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत व त्यांना न्याय मागण्याचा व न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. याचा निश्चितच अभिमान भारतातील नागरिकांना असायला हवा आज सर्व क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करण्याची गरज असून संविधानाचे महत्व व त्याची व्याप्ती याची माहिती होणे आवश्यक आहे. त्याकरिता शालेय व महाविद्यालयीन व उच्च महाविद्यालयीन शिक्षण प्रणाली मध्ये सविधांनावर विशेष अभ्यासक्रम ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले काल दिनांक 30 नोव्हेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आयोजित संविधानाचे महत्त्व स्त्री हक्क व अधिकार कार्यशाळेत समारोपीय सत्राच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे सर  होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे, कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखन, गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे,  भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे उपस्थित होते. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून सन्मित्र सैनिकी विद्यालय बल्लारपूरच्या  प्राचार्य अरुंधती कावडकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments