स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे केले स्वागत new yearकुरखेडा : २०२२ या मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व २०२३ या नवीन वर्षाच्या स्वागताकरिता कुरखेडा येथील २० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून मावळत्या वर्षाला निरोप दिला व नववर्षाचे स्वागत केले.
मागिल अकरा वर्षापासून सुर केलेली रक्तदान शिबिराची परंपरा कायम राखत आज स्वर्गीय जय विक्रांत क्रिकेट क्लब तथा स्व. जिग्नेश क्रिकेट क्लब डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सिंधी भवन कुरखेडा येथे २० रक्तदात्यांनी स्वयंपूर्ण रक्तदान केले.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, कृष्णा गजबे, यांनी रक्तदान शिबिर स्थळी सदिच्छा भेट देत मंडळाचे भरभरून कौतुक केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, पाणी पुरवठा सभापती तथा नगरसेवक अड. उमेश वालदे, गटनेते नगरसेवक बबलु भाई हुसेनि, नगरसेवक रामभाऊ वैद्य, नगरसेवक अतुल झोडे,रुग्ण कल्याण समिती सदस्य विवेक निरंकारी ईश्वर ठाकरे मधुकर वारजुरकर, विनोद नागपूरकर,बंटी देवढगले उल्हास देशमुख,, मोनेष मेश्राम, उपस्थित होते. यावेळी
मंगेश दाणे , निलेश लांजेवार साहिल वरलानी, गौरव दूनेदार, कमलदास मनुजा, ईश्वर ठाकूर, आशुतोष वारजुरकर, हसन वरखडे, पंकज डोंगरे, हेमराज नरोटे, चेतन वाघाडे, रितेश मनुजा, तौसीफ शेख, दीपक धारगये, निखिल सोनकुसरे, हर्ष माखिजा, राहूल गिरडकर, प्रशांत बारसागडे , निखिल वसाके, विवेक गजभिये, यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय जय विक्रांता तथा स्वर्गीय जिग्नेश क्रिकेट क्लब आंबेडकर वार्ड कुरखेडा येथील आयोजक नगरसेवक सागर निरंकारी, यशपाल साहरे, पंकज टेभूर्ने, कार्तिक परचाके, प्रवेश सहारे, नोसाद सय्यद, सोनू राहांगडाले, चेतन वाघाडे, शाहीद हासमी, नितेश निरंकारी, विनायक ठाकरे, पंकज डोंगरे, विवेक गजभिये, धनराज कोरामी, मयूर साहरे यांनी सहकार्य केले.
यावेळी कुरखेडा येथील वैधकिय अधिकारी डॉ. जगदिश बोरकर, निशा चचाने, मचींद्र उईके, यांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे बिपी, शुगर व आरोग्य तपासणी तर गडचिरोली येथील रक्त संक्रमण करण्यासाठी सतीश तडकलावार निलेश सोनवणे नरेश कंडकुंरिवार बंडू कुंभरे, प्रमोद देशमुख यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments