गडचिरोली : जिल्ह्यात पुढील चार दिवस एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह खुप हल्क्या स्वरूपात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता नागपुर येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आज शनिवार (ता.10) दिवसभर ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणाचा परिणाम रबी पिकांवर होत आहे. तुर, लाखोळी, चना आदि पिकांसह पालेभाज्या वर्गीय पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
0 Comments