रानटी हत्तींचा उत्पात सुरूच; चिनेगावातील शेतक-याचे अडीच एकरातील धान पुजन्याची नासधुस wild elephantsकूरखेडा :  तालूक्यात रानटी हत्तींच्या कळपाचा धूमाकूळ अद्यापही सूरूच आहे.  कुरखेडा तालुक्यातील चिनेगांव येथील शेतकरी भगवान पेंदाम यांच्या अडीच एकरातील धान पुजण्याची आज सोमवार (ता.19)  च्या पहाटे हत्तींच्या कळपाने नासधुस करून पूर्णपणे  उद्ध्वस्त करीत फस्त केले. त्यामुळे शेतकरी पेंदाम यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

       मागील दोन महिण्यांपूर्वी  छत्तीसगड मार्गे जिल्ह्यात प्रवेश करणा-या रानटी हत्तीच्या कळपाचे तालूक्यात आगमन झाले होते. पूढे हा कळप देसाईगंज तालूका मार्गे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून परत येत पून्हा तालूक्यात आपला मोर्चा वळविला आहे.  मागील काही दिवसांपासून येथील अनेक ठिकाणी शेत पीकांची नासाडी  सूरू असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.  काही दिवसांपूर्वी नवरगांव येथील शेतक-याच्या अंगणात ठेवले असलेली ५० धानाची पोती हत्तीच्या कळपाने नष्ट केले होते. त्याना लोकवस्ती व शेतजमीनीपासून लांंब जगंलाच्या दिशेने पीटाळून लावण्यात वनविभागाची यंत्रणा कमी पडत आहे. हत्तींंच्या धुमाकूळीने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. उघड्या डोळ्याने उद्ध्वस्त  होत असलेले पीक पाहण्याशिवाय त्याचाकडे पर्याय नाही.  या संकटापूढे शासकीय यंत्रणा वन विभागाने सूद्धा गूडघे टेकल्याचे जाणवत असल्याने शेतक-यांनी अपेक्षा कूणाकडून ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने तातडीने शेतकरी भगवान पेंदाम यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी होत आहे.  चिनेगांव येथीलच शेतकरी शिवाजी कूमरे यांच्या शेतीचे सूद्धा काही प्रमाणात हत्तीच्या कळपाने नूकसान झाले आहे. त्यांना सूद्धा नूकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments