कुरखेडा येथील नगर उपाध्यक्ष नगरसेविका जयश्री रासेकर यांना उच्च नायालयाचा दिलासा kurkheda

जिल्हाधिकारी यांनी पक्ष व्हीप पालन न केल्याचे कारणावरून केले होते अपात्र घोषित


कुरखेडा : येथील नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष तथा नगरसेविका जयश्री रासेकर यांना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अपात्र घोषित केले होते. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णय विरुद्ध उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे धाव घेत प्रकरण दाखल केले होते.
आज दिनांक १२ जानेवारी रोजी न्यायाधीश अविनाश जी. घरोटे यांच्या समोर झालेल्या युक्तिवादात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणाच्या कलम 7 (6) सदस्य अपात्रता कायदा, 1986 आणि 1987 चे नियम अंतर्गत आवश्यक बाबींचे पालन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले नाही व ३४ पानांचा अस्पष्ट आदेश 29.12.2022 रोजी पारित केला अशी बाजू मांडली.
सदर प्रकरणात झालेल्या अनियमितता व बाजू एकता सदर माहिती उपलब्ध करावी असे आदेश दिले. परंतु त्या बाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सध्या अक्षम असून त्या करिता प्रतिवादी यांनी न्यायालयाला वेळ मागितला .
सादर प्रकरणात एका व्यक्ती जो लोकांमधून निवडून आलेला आहे त्याला अपात्र घोषित करतांना नियमांच्या तरतुदींचे कठोर पालन केले गेले असावे असे मत मांडत न्यायालयाने २००० सालीच्या सदाशिव एच. पाटील विरुद्ध विठ्ठल डी. टेके, 2000 (8) SCC 82, चा हवाला देत
प्रतिवादींना प्रकरणाच्या अंतिम निकालासाठी नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले. 23.01.2023 रोजी परत सुनावणीची तारीख देत प्रकरणातील तपशील सदर करण्याचे आदेश दिले आहे. 
तो पर्यंत जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी पारित केलेल्या अपात्र आदेशाचा प्रभाव आणि प्रक्रिया थांबवले जावी असा आदेश पारित केला. 
उच्च न्यायालय कडून सदर प्रकरण आदेश पारित होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाला सदर अपात्रतेबाबत माहिती कळवली गेली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
येत्या २३ जानेवारी ला सादर प्रकरणातील सुनावणी होवून कुरखेडा नगर पंचायतीचे राजकीय समीकरण कुणाकडे वर्ग होतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरणात याचिकाकर्त्या कडून एड. सुमंत यशवंत देवपुजारी यांनी बाजू मांडली व एड. गणेश नारायण खानझोडे यांनी प्रतिवादी यांचे वतीने युक्तिवाद केला.

Post a Comment

0 Comments