संविधान तळागाळात पोचविण्याचा माडिया समाजातील पहिले वकिल ॲड.लालसू नोगोटी, सामाजिक कार्यकर्ता चिन्ना महाका व अविनाश पोईनकर यांचा पुढाकार
गडचिरोलीतील नक्षलप्रभावित अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सिमावर्ती भागात आदिम माडिया समाज आहे. त्यांची स्वतंत्र बोलीभाषा, संस्कृती आहे. देशभरातील ७५ व राज्यातील एकूण ३ आदिम समुदायांपैकी जल-जंगल-जमीनीवर उपजिविका करणारा हा एक समुदाय. मुलभूत गरजांचीच स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही पुर्तता न होवू शकणा-या या भागात 'भारतीय संविधान' खरोखरच पोहोचले आहे काय? मागील वर्षी 'पाथ' संस्थेने एक सर्वेक्षण केले, त्यात ९४% लोकांनी 'संविधान' हा शब्दच ऐकला नाही, हे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहे; त्याचाच एक भाग म्हणून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे स्थानिक आदिम माडिया भाषेत माडिया समाजातील पहिले वकिल ॲड.लालसू नोगोटी, सामाजिक कार्यकर्ता चिन्ना महाका व अविनाश पोईनकर यानी तिघांनी भाषांतर/अनुवाद केलेला आहे. संविधान तळागाळात-घराघरात पोहोचवणं आपली नैतिक जबाबदारी आहे.
असे मत अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले.
0 Comments